Ad will apear here
Next
अभियांत्रिकी पदवी प्रवेश स्वीकृती प्रक्रियेस एक दिवस मुदतवाढ
सोलापूर : प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतील जागावाटप तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर २८ जून रोजी प्रसिद्ध झाले आहे.  पहिल्या फेरीतील जागांच्या वाटपानुसार विद्यार्थ्यांनी जागा स्वीकारण्यासाठी प्रवेश स्वीकृती केंद्रावर (गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, सोलापूर) जाऊन प्रवेशाबाबतची कागदपत्रे व आवश्यक शुल्क ‘डीडी’द्वारे भरून आपला प्रवेश स्वीकृत करण्यासाठी संचालनालयाने चार जुलै रोजी दुपारीतीन वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आवश्यक शुल्क पाच हजार रुपये (खुला प्रवर्ग व इतर मागासवर्ग, व्हीजेएनटी, एसबीसी) व एक हजार रुपये (एससी व एसटी प्रवर्गासाठी) आहे.

काही विद्यार्थी स्वीकृती केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी न करता केवळ ‘ऑनलाइन पेमेंट’ करून परस्पर निघून जातात, असे निदर्शनास आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश स्वीकृती केंद्राकडून खात्री करून पोचपावती घ्यावी, असे आवाहन एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी केले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZWIBE
Similar Posts
प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश नोंदणीसाठी विशेष फेरी सोलापूर : शैक्षणिक वर्ष २०१७-१८मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता १९ ते २० जुलैपर्यंत सुविधा केंद्रावर नोंदणी करण्यासाठी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली नसेल, अशा विद्यार्थ्यांना आपली नोंदणी नव्याने करण्याची संधी उपलब्ध झाली आहे
ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश सोलापूर :  किर्लोस्कर वसुंधरा आंतररष्ट्रीय चित्रपट महोत्सवात एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाने पीपीटी प्रेजेंटेशनमध्ये प्रथम क्रमांक, पथनाट्य स्पर्धा प्रकारात द्वितीय क्रमांक व प्रश्न मंजुशामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. या महोत्सवांतर्गत किर्लोस्कर समूहातर्फे पर्यावरणासंबधी जनजागृती करणारे विविध कार्यक्रम राबवण्यात आले
सृजनरंग नियतकालिक स्पर्धेत ‘ऑर्किड ऑरा’ सर्वप्रथम सोलापूर : सोलापूर विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या सृजनरंग व्यावसायिक नियतकालिक स्पर्धेत एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘ऑर्किड ऑरा २०१७’ला सर्वोत्कृष्ट नियतकालिक म्हणून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व विद्यार्थ्यांमधील लेखक चिरंतन रहावा, यासाठी महाविद्यालय
सोलापुरात ड्रोन कार्यशाळेचे आयोजन सोलापूर : ड्रोन म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ते एक मोठे यंत्र आणि त्याद्वारे करण्यात येणारी फोटोग्राफी पण आपल्या तळहातावर बसतील एवढे नॅनो ड्रोन तयार कसे करता येतील या विषयावर एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामार्फत व मुंबई आयआयटीच्या द्रोणा एव्हिएशन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language